अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर
गौरव पोंक्षे माखजन:
महाराष्ट्र राज्यातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पोषण आहारच्या अन्नधान्याच्या दर्जा मध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून,दर्जा उंचावला आहे.अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाई नंतर हे परिणाम दिसून येत आहेत.विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहारच्या दर्जात कोणतीही हलगर्जी चालणार नाही अशा सक्त सूचना खात्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिल्यावर आणि थेट पुरवठा दारावर कारवाई चे संकेत दिल्यावर,अन्न धान्याच्या दर्जात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसत आहे.शिवाय शाळा शाळात पोषण आहार शिजवणाऱ्या व शिक्षक वर्गा कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वी पुरवठा केलेल्या आण धान्यात टोका,किडलेले अन्न धान्य,निकृष्ठ डाळी,मुदत संपत आलेली खाद्य तेल,निकृष्ठ तांदूळ आदींचे प्रमाण अधिक असे.पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे अन्न धान्य साफ सफाई करण्यात नाकी नऊ येत असत.पण अलीकडे या अन्न धान्याच्या दर्जा मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी,कुपोषण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षणाला पोषण सहाय्य राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला.व् शालेय पोषण आहार योजना सुरु केली. व प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला सुके अन्न धान्य देण्यास सुरवात झाली.
नोव्हेंबर २००१ साली सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला.कोरडे अन्न धान्य विद्यार्थ्यांना घरी न देता प्रत्येक शाळेत गरम ताजे अन्न शिजवण्याची व्यवस्था करा असे आदेश प्रत्येक राज्याला दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करत महाराष्ट्र सरकार ने २००२ साली राज्यात प्रत्येक शाळेत प्रत्यक्ष पोषण आहार शिजवण्याची व्यवस्था सुरु केली.
केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना होताना,मधे अनेक घटकांचे पोषण होत राहिले.दिवसागणिक शाळांना पुरवठा केलेल्या अन्न धान्याचा दर्जा वर्षांगणिक ढासाळत राहीला.याविषयी अनेक बातम्या ही पाहायला मिळाल्या.परंतु अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी बसलेल्या तुकाराम मुंडे यांनी पोषण आहारच्या दर्जा मध्ये पुन्हा वाढ होण्यासाठी यशस्वी ठरत आहेत.
शालेय पोषण आहार शाळेत शिजवून विद्यार्थ्यांना वाढणे.आणि त्यामधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे अदा करावेत अशी मागणी देखील शासनाकडे होत आहे.त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात असा विश्वास पालक वर्गाला आहे.
पोषण आहारात लगेंच मुदत न संपणारे खाद्य तेल,उत्तम प्रतीच्या डाळी,तांदूळ शाळांना मिळायला सुरवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.













