प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे ‘जन आरोग्य समिती’ची सभा आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्याचा निर्धार

आबलोली(वार्ताहर):
गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे ‘जन आरोग्य समिती’ची आढावा बैठक जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या श्रीम. नेत्राताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत आबलोली कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवा, उपकेंद्रांचे कामकाज, स्वच्छता व पोषण अभियान तसेच रुग्णकल्याण विषयक विविध विकासकामांवर विस्तृत चर्चा करण्यात येऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.या सभेला समिती सह-अध्यक्ष तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जी. पी. जांगीड, सदस्य सचिव तथा प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक पांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली
तर समिती पदाधिकारी व मान्यवर द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल विजय मोहिते,आरोग्य साहाय्यिका श्रीम. नेहा निलेश गुहागरकर, ग्रामपंचायत आरोग्य उपसमिती सभापती ऋषिकेश बाईत,पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने प्रतिनिधी साळवी ,स्थानिक स्वराज्य संस्था व विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी,आरोग्य उपकेंद्र स्तरावरील जन आरोग्य समितीचे प्रतिनिधी म्हणून सरपंच व प्रशासक उपस्थित होते. यामध्ये अरुण अनंत पेजले (सरपंच, पाली), श्रीम. प्रगती प्रकाश मोहिते (सरपंच, कोतळूक), विजय रुपाजी धोपट (सरपंच, शीर), अनिल मोरे (प्रशासक, पिंपर), श्री. प्रतिक भीमसेन जाधव,युवा प्रतिनिधी संदेश काजरोळकर तसेच निमंत्रित सदस्य म्हणून श्रीम. वैष्णवी वैभव नेटके (मान.सरपंच निर्मल ग्रामपंचायत आबलोली), ऍड.प्रतिक प्रदीप पवार (सरपंच, खोडदे), ॲड. प्रमेय आर्यमाने, प्रकाश भोजने (सरपंच, मासू), मंगेश मते, श्रीमती. सुरेखा पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार व तत्पर आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी अध्यक्षा नेत्रा ठाकूर यांनी केले.