शिक्षक दिलीप चव्हाण यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव
लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पन्हळे नं. १ शाळेचे शिक्षक दिलीप चव्हाण यांनारत्नागिरी जि. प.चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
शिक्षक दिलीप चव्हाण यांनी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांचे उत्कृष्ट मार्गदर्शन करत, यश मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे म्हणून ते सातत्याने पालकांचे प्रबोधन करतात. बालरक्षक’ म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम करत शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी पावले उचलली आहेत. आजवर काम केलेल्या सर्वच्या सर्व चारही शाळांना ‘आदर्श शाळा’ बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. लोकसहभागातून शाळेसाठी ६ लाखांहून अधिक निधी उभा करून शैक्षणिक उठाव घडवून आणला आहे.
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत त्यांच्या ‘पन्हळे नं. १’ या शाळेने लांजा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नासा व isro मार्गदर्शन: विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नासा (NASA) आणि इस्रो (ISRO) च्या उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच रत्नागिरीचा भास्कराचार्य सारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे.
त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट व ध्येयवादी योगदान दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा प्रतिष्ठित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ लांजा तालुक्यातील कर्तबगार शिक्षक दिलीप चव्हाण यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













