वैभववाडीत भाजपाचा दहीहंडी उत्सव उत्साहात

डोंबिवलीतील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाची पाच थरांची सलामी

गोविंदा पथकांसह बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. वैभववाडी बाजारपेठेतील इनामदार प्लाझाच्या भव्य पटांगणावर झालेल्या या उत्सवाला नागरिक, गोविंदा पथके आणि बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच कोल्हापूर येथील कशिश ऑर्केस्ट्रा ने विविध बहारदार गाणी सादर करत कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.

या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते झाले. मुंबई-डोंबिवली येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी देत उपस्थित रसिकांची मने जिंकली. महिला गोविंदा पथकाच्या या थरारक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

या उत्सवात शिवशक्ती महिला गोविंदा पथक, डोंबिवली, मारुती प्रसन्न गोविंदा पथक, राजापूर-आंबेवाडी, रामेश्वर गोविंदा पथक, एडगाव तसेच दिलीप रावराणे पुरस्कृत शिराळे येथील गोविंदा पथकाने दहीहंडीला सलामी दिली.

यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, भालचंद्र साठे, बाप्पी मांजरेकर, नासीर काझी, देवानंद पालांडे, प्रदीप रावराणे, सुनील रावराणे, मंगेश लोके, विजय तावडे, संजय चव्हाण, प्राची तावडे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, हुसेन लांजेकर, नेहा माईनकर, शारदा कांबळे, संगीता चव्हाण, सुवर्णा संसारे, सज्जनकाका रावराणे, प्रकाश पाटील, अतुल सरवटे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, महेश संसारे, रितेश सुतार, रमेश शेळके, रणजित तावडे, स्वप्नील खानविलकर,, रोहन रावराणे, विवेक रावराणे, संतोष पवार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गोविंदा पथकांच्या थरारक सलामी आणि बालगोपाळांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सवाला विशेष रंगत आली.