शिवसेना राजापूर शहर प्रमुख सौरभ खडपे आयोजित व आमदार किरण सामंत पुरस्कृत दहीहंडी भू पंचक्रोशीच्या श्री कालिकादेवी गोविंदा पथकाने फोडली

राजापूर  प्रतिनिधी : शहर आणि तालुका परिसरात शनिवारी पारंपारिक पध्दतीने दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी जवाहरचौक येथे शिवसेना राजापूर शहर प्रमुख सौरभ खडपे आयोजित व आमदार किरण सामंत पुरस्कृत आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात शहर आणि तालुक्यातील १६ गोविंदा पथकांनी भाग घेत उत्सवाची रंगत वाढवली. या उत्सवात मानवी मनोऱ्याचा थरार पाहायला मिळाला. यावर्षी शहरातील हनुमान प्रसन्न खडपेवाडी या गोविंदाने पथकाने आपले आठ थरांचे स्वप्न साकारत एकच जल्लोष केला. तर सायंकाळी उशीरा भू पंचक्रोशीच्या श्री कालिकादेवी गोविंदा पथकाला ही दंहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. या पथकाने सात थर रचत ही दहीहंडी फोडली.
या गोविंदा पथकाला राजापूरच्या नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांसह मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक, गदा व चषक देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी प्रथमच हनुमान प्रसन्न गोविंदा पथकाने अत्यंत जिद्दिने आणि संयमी खेळाचे प्रदर्शन करत आठ मानवी मनोरे रचत सलामी देत राजापूरच्या इतिहासात एक प्रकारचा विक्रम प्रस्तापित केला. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
या दहीहंडी उत्सवात शहरासह ग्रामीण भागातील १६ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. या सर्व गोविंदा पथकांना रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह देऊन् गौविण्यात आले. आमदार किरण सामंत, आयोजक सौरभ खडपे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, मुन्ना खामकर, बाबा भिंगार्डे, राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष संजय ओगले, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांसहन अनेकांनी या उत्सवाला हजेरी लावली.
  सायंकाळी उशीरा झालेल्या सांगता समारंभला नगरसेवक एड. जमिर खलिफे, एड. राहुल तांबे, दिलीप अमरे, दीलीप चव्हाण, नगरसेविका प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, उर्मिला बाकाळकर यांसह मान्यवर उपस्थित होते.
  या प्रसंगी उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे नितीन ढेरे, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजापूर शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सौरभ खडपे मित्र मंडळाने या उत्सवाचे अतिशय चांगले नियोजन केले होते.