भागेश्र्वर मंदिरात किल्ला ग्रामस्थांनी श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात केला साजरा

रत्नागिरी l प्रतिनिधी :  मोबाईल, व्हॉटसअप, इंस्टाग्राम, गेम इंटरनेट युगात तरुण पिढी मोबाईल मध्ये व्यस्त होत असताना सुद्धा किल्ला गावात तरुण पिढी खूप उत्साहात श्रावणी सोमवार नामस्मरण मध्ये सामील झाल्याचे चित्र दिसत होते. सलग बारा तास न थांबता टाळ मृंदुगाच्या गजरात सदर नामस्मरण, भजन केले जाते. सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भागेश्र्वर मंदिर, किल्ला येथे दत्तप्रसादिक मंडळ किल्ला , आयोजित (एक्का) एकदिवसीय नामस्मरण, भजन सोहळा किल्ला ग्रामस्थ तर्फे खूप उत्साहात साजरा होतो. त्याची सांगता मंगळवारी सकाळी १२ वाजता भागेश्र्वर मंदिरास वीणा हाती घेऊन टाळ, मृदुंग वाजवून भजन म्हणत मंदिरास प्रदक्षिणा घालून करण्यात आली. त्यावेळेस कपिल नागवेकर , शेखर किर, संदीप तळेकर, सुनील किर, दीपक नागवेकर, योगेश किंजळे, वैभव नागवेकर, स्वप्नील नागवेकर, सुरेन किर, तेज किर , व इत्यादी ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.