सावंतवाडी | प्रतिनिधी : दत्तमाऊली दशावतार शिक्षण प्रशिक्षण दशावतार आणि बहुउद्देशीय मंडळ मंडळाचा त्रैवार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ ही संपन्न झाला.
शालेय विद्यार्थ्यांना दशावतार म्हणजे काय हे समजण्यासाठी विविध शालेय गटांत दशावतार या विषयावर निंबध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतेक स्पर्धकांनी दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांनी लिहिलेल्या आणि विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या लेखाचा संदर्भ सहभागी स्पर्धकांनी घेतला असे गौरवोद्गार या वेळी व्यासपीठावरून निवेदक नेवगी सर यांनी काढले प्रा.खानोलकर यांच्या लेखणीतून दशावतार चळवळ अधिक व्यापक झाली आणि त्याचे संशोधनात्मक अभ्यास तळागाळात पोचला.
असे हि या वेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तेंडोलकर यांचा त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, भव्य दशावतार सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तर निवृत्त शिक्षिका माधवी यशवंत मठकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच यावेळी पाट येथील स. का. पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना तिला वाचवणाऱ्या आंदुर्ले येथील जयेश कोनकर, निवती येथील जितेश भगत यांचाही शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव दत्तप्रसाद शेणई यांनी संस्थेच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीबाबत माहिती देताना या प्रवासात सहकार्य केलेल्या सर्व दात्यांचे आभार मानले. व नाट्यरसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंडळाच्या पहिल्या वर्षी १२०, दुसऱ्या वर्षी २३५ व तिसऱ्या वर्षी तब्बल २७० नाट्यप्रयोग सादर केल्याचेही सांगितले. तर अध्यक्ष बाबा मयेकर यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती देताना आपली संस्था ही नाट्यप्रयोगातून समाज प्रबोधनाचे काम करत असून या माध्यमातून अजून गरुड भरारी घ्यायची असल्याचे त्यांनी नमूद केले.
दत्तमाऊली माऊली यावेळी व्यासपीठावर मठ सरपंच रुपाली नाईक, ग्रा. प. सदस्य नित्यानंद शेणई, जेष्ठ दशावतार कलाकार महेश गवंडे, उद्योजक दीपक ठाकूर, ऍड. सोनू गवस, सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, ऍड. पी. डी. देसाई, लेखापरीक्षक राकेश धरणे, मंडळाचे हितचिंतक राजन बोवलेकर, दोडामार्ग दशावतार कलाकार संघटना अध्यक्ष सुभाष लोंढे, खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे चालक मालक बाबा मेस्त्री, झी २४ तास चे राजा दळवी, दयानंद शेणई, कुडाळ सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, कुडाळ माजी पं स सभापती संजय वेंगुर्लेकर, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमात या मंडळाकडून “दत्तमाऊली दशावतार कला तपस्वी पुरस्कार २०२३” जेष्ठ दशावतार कलाकार यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांना देऊन गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना मी या सत्काराने भाराऊन गेलो असे म्हणत सत्कार मुर्ती यशवंत तेडोलकर भावुक झाले.











