जिल्हास्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचे वर्चस्व

आचरा | अर्जुन बापर्डेकर : जिल्हास्तरीय शालेय शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 19 संघानी सहभाग घेतला होता .यात17 वर्षे मुलगे- प्रथम क्रमांक जनता विद्या मंदिर त्रिंबक द्वितीय क्रमांक- आर पी डी हायस्कूल सावंतवाडी तृतीय क्रमांक -सौ ही भा वरस्कर हायस्कूल वराड. सतरा वर्षे मुली प्रथम क्रमांक -जनता विद्या मंदिर त्रिंबक द्वितीय क्रमांक- सौ हि भा वरस्कर हायस्कूल वराड तृतीय क्रमांक- शिवाजी विद्यालय काळसे
एकोणीस वर्ष मुलगे प्रथम क्रमांक -कुडाळ हायस्कूल स्कूल कुडाळ द्वितीय क्रमांक-टोपीवाला हायस्कूल मालवण तृतीय क्रमांक -जनता विद्या मंदिर त्रिंबक 19 वर्षे मुली प्रथम क्रमांक कुडाळ हायस्कूल कुडाळ द्वितीय क्रमांक- जनता विद्यामंदिर त्रिंबक तृतीय क्रमांक- प्रगत विद्या मंदिर रामगड यांनी मिळविला.

सदर जिल्हास्तरीय शालेय शासकीय शूटिंग बॉल स्पर्धा 17वर्षे व 19वर्षे वयोगटातील मुली मुलगे अशा चार गटात जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाल्या स्पर्धेचे उदघाटन आचरा गावचे प्रतिष्ठित व्यापारी मांगिरीष सांबारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा डायरेक्ट शूटिंग बॉल असोसिएशनचे जिल्हा सेक्रेटरी सुरेंद्र सकपाळ जिल्हा संघटक सुभाष तळवडेकर क्रीडा अधिकारी विजय शिंदे मालवण तालुका समन्वयक अजय शिंदे संस्था सेक्रेटरी अरविंद घाडी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग पंच सिताराम सकपाळ, जयवंत बागवे, राजू भावे, अमेय लेले, सुरेंद्र सकपाळ , क्रीडा शिक्षक श्री दिनेश सावंत, शैलेश मुळीक, वैभव कोंडस्कर ,अविनाश परब ,श्रावण गवळी, सागर सावंत , पाताडे सर विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.