स्टेट बँक सेवेचा दर्जा खालावला,ग्राहक सेवा सुधारा

व्यापारी,ग्राहक,बँक याच्या संयुक्त मेळाव्यात ग्राहकांची नाराजी

बँकेच्या महाप्रबंधक श्रीमती ग्रेस,उपमहाप्रबंधक;अंबुलकर यांनी सेवेचा दर्जा सुधारण्याची दिली हमी

कणकवली | प्रतिनिधी : उच्च दर्जाच्या ग्राहक सेवेची अपेक्षा स्टेट बँक मधून सिंधुदुर्गातील व्यापारी व ग्राहकांना आहे. मात्र तिशी सेवा मिळत नाही. अधिकारी कर्मचारी सेवक म्हणून काम करत नाहीत तर टोपले टाकू काम करतात.सेवेची सुधारणा स्टेट बँक व्यवस्थापनाने करावी अशी मागणी बँक आणि व्यापारी याच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली. बँकेच्या महाप्रबंधक श्रीमती ग्रेस,उपमहाप्रबंधक (व्यवसायवृद्धी) रत्नागिरी आंचल सुजीत अंबुलकर यांनी सेवेचा दर्जा सुधारण्याची हमी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ व कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने गणेश मंगल हॉल, कट्टा- मालवण येथे स्टेट बँक ऑफ री. इंडिया रत्नागिरी आंचल अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापक व स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एसबीआयची ग्राहक सेवा, कामकाज व योजना या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी एक व्यापक सभा महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांचे अध्यक्षतेखाली झाली. या वेळी व्यापारी बांधवांनी बँकेच्या शाखेत ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा व कर्मचाऱ्यांकडून दिली जाणाऱ्या हिन वागणुकीबद्दल उदाहरणांसह संताप व्यक्त केला.

उच्च दर्जाच्या ग्राहक सेवेची अपेक्षा करतांनाच स्टेट बँक व सिंधुदुर्गातील व्यापारी यांच्यातील संबंधांची सुधारणा होण्यासाठी बँकेने शाखा स्तरावर ग्राहक मेळावे घेणे, छोट्या व्यापाऱ्यांकरिता अल्प प्रिमियम मध्ये विमा संरक्षण, शाखा तेथे e gyalary, प्रत्येक शाखेत विभागीय कार्यालयचे फोन नंबर व पत्ता प्रसिद्ध करणे व ग्राहकांशी संबंधित प्रत्येक कामासाठी लागणाऱ्या वेळेचा तक्ता आणि नागरिकांची सनद असा फलक ठळक पणे दिसेल अश्या ठिकाणी लावणे.पुरेशा प्रमाणात व आवश्यकतेनुसार सुट्टी नाणी उपलब्ध करून देणे. शाखा निहाय जनसंपर्क अधिकारी उपलब्ध करून देणे. एटीएमची परिस्थिती सुधारणे व त्यात कायम पैसे उपलब्ध ठेवणे. ठेवणे, ज्येष्ठ व आजारी ग्राहकांसाठी घरपोच बँकींग सेवा देणे, जिल्ह्यातील सर्व शाखांत पैसे भरण्याची सयंत्रे उपलब्ध करून देणे, गृहकर्जासाठी आवश्यक सर्च रिपोर्टची फी बँके मार्फतच अदा केली म्हणजे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही व कर्ज प्रक्रिया सुलभ होइल अशा व्यवस्था ठेवण्याची मागण्या यावेळी व्यापारी संघटना आणि ग्राहकांनी केल्या.

ग्राहक सेवेतील त्रुटींबाबत व्यवस्थापनाला जाणीव असून त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू असून नजिकच्या काळात यात लक्षणिय सुधारणा दिसतील व महासंघाने सुचविलेल्या सर्व सूचनांबाबत पूर्णपणे लक्ष घालून सहकार्य करण्याची हमी बँकेचे उपमहाप्रबंधक (व्यवसायवृद्धी) रत्नागिरी आंचल सुजीत अंबुलकर यांनी दिली.
यावेळी सर्व शाखाधिकाऱ्यांनी आपल्या शाखेच्या माध्यमातून सर्वांना चांगली सेवा देण्याचीही हमीदिली. प्रवीण शेवडे, नितीन तायशेटे, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, विलास कोरगांवकर, राजा राजाध्यक्ष, निलेश धडाम, विवेक नेवाळकर, नितीन वाळके यांनी ग्राहकांच्या समस्या मांडल्या. या चर्चेला बँकेच्या महाप्रबंधक श्रीमती ग्रेस यांनी उत्तर दिले.