वेंगुर्ले : प्रतिनिधी
कै. सौ. महानंदा ऊर्फ सुनंदा शामप्रसाद गुरव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराचे पुजारी गुरव कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर वेंगुर्ला येथे उत्साहात संपन्न झाले. पू. प्रा. शाळा वेंगुर्ला नं. १ येथे आयोजित या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबीरात एकूण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महीलांचाही उत्स्फूर्त प्रतिसात लाभला. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदानातून जीवनदानाचा संदेश देत शिबिराची सांगता शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक विनय नेरूरकर, सचिन शेटये, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन परुळकर, महेश राऊळ, मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉ. ओंकार खानोलकर, तुषार परब, आयुष चॅलेंजरचे नाना राऊळ, युवासेनेचे पंकज शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात मान्यवरांपैकी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर व पंकज शिरसाट यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. महिला रक्तदात्या म्हणून रक्तदान करणाऱ्या जि. प. सदस्या सुजाता पडवळ व मेघना राऊळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करणारे जय मांजरेकर यांचे वयाच्या २४ व्या वर्षी आतापर्यंत २५ वेळा रक्तदान केले म्हणून व उन्मेष वेंगुर्लेकर यांचा आपत्कालीन परिस्थितीत बांबुळी येथे रक्तदान करुन प्राण वाचवले म्हणून गौरव करण्यात आला. तसेच ४० पेक्षा अधिक रक्तदान शिबिराचे आयोजन केले म्हणून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व सलग ५ वर्षे आयुष चॅलेंजर परबवाडा मित्रमंडळ वेंगुर्ला हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे म्हणून या संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पू. प्रा. शाळा वेंगुर्ला नं. १ ला भेटवस्तू म्हणून पंखा देण्यात आला.
या रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्नती लटकन, रक्तपेढी तज्ज्ञ शिरसाट, अक्षय सावंत, नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगडे, समाजसेवा अधीक्षक सौरभ शिंदे, परिचर सागर सावंत, प्रथमेश घाडी व गणेश मांजरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी कै. सौ. महानंदा गुरव यांचे सुपुत्र मंगेश गुरव, पुतणे प्रसाद गुरव, तसेच दिनेश शिरसाट, अमोल पडवळ, अमोल खानोलकर, अजय खानोलकर, मानस शिरसाट, उन्मेष वेंगुर्लेकर, मयुरेश गुरव, गणेश नार्वेकर, विनय गरगटे यांनी मेहनत घेतली. याशिवाय वेताळ प्रतिष्ठानच्या सानिया वराडकर, सागर सावंत, ओम कुंभार व सिद्धार्थ चौधरी यांनीही विशेष परिश्रम घेतले.













