सावंतवाडी : माजगाव-चिपटेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी पं. स. सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांच्या पुढाकाराने वनविभाग कार्यालयात संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक परवानग्या व इतर बाबींवर बैठकीत चर्चा करून लवकरात लवकर डांबरीकरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
रस्ता खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.













