चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय (स्वायत्त) चिपळूण येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय योगासन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेकरिता मुलांच्या संघामध्ये एस.एच.केळकर देवगड, घरडा इन्स्टिट्यूड लेवल व डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण इत्यादी महाविद्यालयांचा सहभाग तसेच मुलींच्या संघामध्ये गोगटे जोगळेकर रत्नागिरी, एस.एच. केळकर महाविद्यालय देवगड आणि डी.बी.जे. महाविद्यालयाचे चिपळूण इ. महाविद्यालयानी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे उद्घाटन जिमखाना विभाग प्रमुख शांताराम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे सचिव शशांक उपशेट्ये, नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, उपप्राचार्य चेतन आठवले, परीक्षा विभाग नियंत्रक प्रा. सुहास वाघमोडे, प्रा. भादुले तसेच जिमखाना विभाग चेअरमन डॉ. सम्राट माने व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. उल्हास मोहिते व प्रा.जीवनराज कांबळे आणि वरिष्ठ महाविद्यालय क्रीडाशिक्षक प्रा.राम कदम,कर्मचारी विशाल मोहिते तसेच क्रीडा विभाग समिती सदस्स्य यांनी मेहनत घेतली.













