चांद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वीते नंतर दाभोली इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यां कडून जल्लोष

चांद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वीते नंतर दाभोली इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यां कडून जल्लोष

वेंगुर्ला : प्रतिनिधी
वेंगुर्ले येथील दाभोली इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शास्त्रज्ञांचे व मोहिमेचे कौतुक केले. पारंपरिक पद्धतीने शाळेतील बँड पथक वाजवीत मुलानी बँजोच्या रिदम मध्येच सारे जहाँ से अच्छा हे गीत गुणगुणत भारत माता की जय असा जयघोष केल्याने शालेय परिसर आनंदाने दुमदुमला. प्रोजेक्टर द्वारे चांद्रयान तीन चे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी पाहिले व त्यानंतर मोहीम यशस्वी झाल्याबद्दल सेलिब्रेशन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, विज्ञान विभाग प्रमुख वसंत पवार ,तंत्र शिक्षण विभाग समन्वयक दिपक पाटील ,भूगोल विभाग प्रमुख श्रीमती रेश्मा चोडणकर,एनर्जी व एन्व्हायरमेंट विभागाचे प्रमुख राजेश कांबळी, वर्कशॉप आणि इंजीनियरिंग व टेक्निकल विभाग प्रमुख दत्तप्रसाद सांगेलकर , एग्रीकल्चर आणि गार्डनिंग विभाग प्रमुख प्रतिक्षा पोईपकर, फूड टेक्निशियन विभागाच्या प्रमुख सोनाली कुडाळकर, शाळेचे कर्मचारी नैमेश करंगुटकर ,अमोल दाभोलकर व अबू मिशाळे सह विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी
चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर वेंगुर्ले दाभोली इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आनंदोत्सव साजरा करताना