भाजपच्या पदवीधर प्रकोष्ठ कोअर कमिटी सह-संयोजकपदी अजय दळवी यांची फेर नियुक्ती

मंडणगड प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश पदवीधर प्रकोष्ठ कोअर कमिटी चे सह-संयोजकपदी अजय दळवी शेनाळे यांची निवड झाली आहे. रायगड रत्‍नागिरी सिंधुदुर्ग या तिन जिल्ह्याची जबाबदारी देत फेर नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांना कोकण पदवीधर मतदार संघाचे कोकण सहसंयोजक म्हणुन संघटनात्मक जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पदवीधर प्रकोष्ठाचे प्रभारी सुनील लोढा यांच्या स्वाक्षरीने १८ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र जारी करण्यात आले. पदवीधर प्रकोष्ठाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने अजय दळवी यांच्यावर सह-संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पदवीधर वर्गाशी संपर्क वाढविणे, संघटन मजबूत करणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये पदवीधरांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
या नियुक्तीबद्दल अजय दळवी यांचे आमदार प्रमोज जठार माजी आमदार विनय नातु जिल्हाध्यक्ष सतिश मोरे तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडीक यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन होत आहे. नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.