रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील मच्छिमार्केट येथील चर्चसमोर तब्बल 91 हजारांच्या 7 ग्रॅम ब्राउन हेरॉईनसह शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवार 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1.35 वा.सुमारास करण्यात आली.
नुरमोहम्मद दिलमोहम्मद खान उर्फ कल्लू (25,रा.भाजी मार्केटच्या समोर), मस्तान शेख (26,रा.अजगावकरवाडी बाजारपेठ,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस कर्मचारी दिपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार रत्नागिरी शहर पोलिस ठाणे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मच्छिमार्केट चर्चच्यासमोरील रस्त्यावर दोन संशयित त्यांना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी व झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून पिशवीत 91 हजारांचा ब्राउन हेरॉईन (टरकी) या अमली पदार्थाच्या एकूण 182 पुड्या मिळून आल्या. तसेच एक 20 हजारांचा मोबाईल असा एकूण 1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल संशयितांकडून हस्तगत करण्यात आला. संशयितांविरोधात एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क),21(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी मच्छिमार्केट परिसरात ९१ हजार रुपयांच्या ब्राऊन हेरॉईनसह दोघे जेरबंद!












