चौके तंटामुक्ती अध्यक्षपदी पी.के.चौकेकर यांची निवड

चौके | प्रतिनिधी : चौके ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अध्यक्षपदी विद्यमान उपसरपंच पी.के .चौकेकर यांची एकमताने निवड करण्यात आली या समितीमध्ये सदस्य म्हणून सरपंच गोपाळ चौकेकर, माजी सरपंच राजन गावडे , ऍड.अंबरीश गावडे ,माजी सैनिक परशुराम गावडे ,पत्रकार नितीन गावडे , नंदकुमार राणे (व्यापारी प्रतिनिधी), चेतन सावंत ( विद्यार्थी प्रतिनिधी) तसेच सदस्य म्हणून मंगेश पात्रे, मयूर गावडे , सुचिता पोळ, विशाखा चौकेकर, सूर्यकांत गावडे, उदय गावडे , प्रभारी पोलीस पाटील रवींद्र गावडे ,ग्रामसेवक जी.डी . नलावडे, तलाठी सुहास थोरात यांची निवड करण्यात आली.
गावात तंटे होऊ नयेत तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटवण्याची व्यवस्था निर्माण व्हावी यादृष्टीने गाव तंटामुक्ती समितीचे प्रयत्न राहतील अशी ग्वाही अध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी दिली.