युवासेना सिंधुदुर्गचा सामाजिक उपक्रम;
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रक्तदान शिबिर
रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
स्वप्निल कदम-कुडाळ :
जिल्ह्यातील रुग्णांना भेडसावणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन युवासेना सिंधुदुर्ग आणि जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २७ सप्टेंबर रोजी ‘सिंधुदुर्गच्या राजाच्या दरबारात’ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे शिबिर होणार असून आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, प्रसूतीतील माता तसेच विविध आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.
‘रक्तदान करा… जीवनदान द्या’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडी, चाकरमानी बांधव तसेच सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यातील संकटाचा क्षण दूर करून त्याला जीवनाची नवी आशा देऊ शकतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान नोंदणी व संपर्क : ८२३७१६२११५ / ९३५९०९७८९०












