पालकमंत्री नितेश राणे होडावडा येथे अधिकाऱ्यांसोबत पोहचवले शेतात…

नुकसानग्रस्त भात पिक, पाणी आटलेल्या विहिर आणि बंधाऱ्याची केली पाहणी…

वेंगुर्ले : दाजी नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून निवडला आहे. तेथील परिस्थिती काय आहे. याची पाहणी करून माहिती घेणे यासाठी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत हा पाहणी दौरा सुरू केला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडवडा येथील नुकसानग्रस्त भात पिकाची पाहणी, पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेल्या विहिरींची पाहणी आणि येथील पाऊस कमी पडल्यामुळे पाणी कमी झालेल्या बंधाऱ्याची पाहणी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपल्या पाहणी दौऱ्याची माहिती दिली.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प.शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजप तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, जि.प. सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपसरपंच राजबा सावंत, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच वैभवी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, कृषी विस्तार अधिकारी कोरगावकर, सावंत, मंडळ अधिकारी प्रेरणा गिरप, नेत्रा सावंत, तसेच किशोर परब, नितीन चव्हाण, राहुल पै, तुषार साळगांवकर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांनी लोकांशी संवाद साधून गेल्या वर्षी आणि यावर्षी पावसाचा काय परिणाम झाला आहे याची माहिती घेतली. विहिरींची पाण्याची पातळी किती आहे, छोटे बंधाऱ्यांमध्ये पाणी किती आहे. ते आपण ग्रामपंचायत लेवलला करू शकतो का. त्यासाठी लोकांमध्ये जागृत आणणे यासाठी आपला हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी मदत सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणारच आहेत. पण मदत रोख स्वरूपात असेल किंवा अन्य स्वरूपात त्याबाबत माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आणि आपल्या लोकांना धीर देण्याचे काम आम्ही आमच्या माध्यमातून या दौऱ्यातून सरकार म्हणून करत आहोत, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.