वैभववाडी : विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाधवडे (नवलाईदेवी वाडी) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रमेश शिवाजी शिंदे आणि संदीप अर्जुन यादव यांना प्रातिनिधिक स्वरूपात उत्पन्न दाखले प्रदान करण्यात आले. शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सवलती तसेच विविध शासकीय लाभांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले व प्रमाणपत्रे नागरिकांना सुलभतेने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, सरपंच लिना पांचाळ, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, पंचायत समिती सदस्य साधना नकाशे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील तसेच संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.












