कोळवणखडी गावातील तीन ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील शेकडो ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहिर प्रवेश

उपसभापती अभिजित गुरव यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत

राजापूर प्रतिनिधी: तालुक्यातील कोळवणखडी गावातील तीन ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील शेकडो ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हासरचिटणीस व तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व ग्रामस्थांचे भाजपामध्ये स्वागत करण्यात आले. तशी माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष मोहन घुमे व एड. एकनाथ मोंडे यांनी दिली आहे.

तालुक्यात भाजपाकडून संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक गावात भाजपाचे पक्ष संघटन अधिक बळकट होत आहे. यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या मागदर्शनाखाली भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत आहेत. केंद्र व राज्यातील भाजपा सरकराच्या माध्यमातुन होणारी विकास कामे यावर विश्वास ठेवत अनेकजण भाजपाचा झेंडा हाती घेत आहेत.

रविवारी कोळवणखडी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी मोरे यांसह ग्रामपंचायत सदस्य सरिता मोरे, संचिता बने व विकास मोरे यांसह शेकडो ग्रामस्थानी भाजपात जाहिर प्रवेश केला. यामध्ये काशिनाथ मोरे, नामदेव मोरे, शशिकांत मोरे, रूपेश मोरे, मंगेश मोरे, रूतिका रूपेश मोरे, रमेश मोरे, रेश्मा मोरे, निता मोरे, वैशाली, घनश्याम मोरे, वैजयंती मोरे, गजानन मोरे, रविंद्र मोरे, रमेश बने, शैलेश मोरे, योगेश रहाटे, माजी सरपंच आशा मोरे, माजी उपसरपंच सुहास मोरे, अरुण मोरे, गणपत मोरे, सुनिता कदम, इंद्रायणी चव्हाण, मालती रहाटे, सुमती रहाटे, विठ्ठल रहाटे, प्रकाश मोरे आदींसह गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहिर प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांच्या सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एड. एकनाथ मोंडे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, राजा नलावडे, भोला गांगण, मंडल सरचिटणीस समीर खानविलकर अमर वारेसे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व ग्रामस्थांचे पक्षात स्वागत करत गुरव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल व गावातील विकास कामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही दिली.

.