मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चा निर्णय
कणकवली / प्रतिनिधी :प्रतिबंधीत गुटखा घाऊक खरेदी करून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी किरकोळ विक्री केल्याप्रकरणी येथील राजन शांताराम पारकर व रविंद्र मुकुंद माणगांवकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे एकल न्यायमुर्ती अश्विन भोबे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजुर केला. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत व अॅङ अद्वैत वजराटकर यांनी काम पाहिले.
३० जुलै २०२६ रोजी बांदा येथील तपासणी नाक्यावर बांदा पोलिसांनी आशिफ मेमन (रा. कोलगांव, सावंतवाडी) याच्या ताब्यातील मारूती इको गाडी तपासणी केली. यात ३.५० लाख रुपये किंमतीचा विविध प्रकारचा प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. म्हणून त्याच्याविरूद्ध भा.न्या.सं. कलम १२३, २२३, २७१, २७५ सह अन्न सुरक्षा अधिनियम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात हा गुटखा हा आरोपी कृष्णा केळजी, गणेश शिवगण, शिवाजी चव्हाण, राजन पारकर, रविंद्र माणगांवकर, तपर्शी आमोणकर यांना विक्रीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्या मोबाईल व गुगल पेवरील व्यवहारही उघड झाले होते.
याबाबत राजन पारकर व रविंद्र माणगांवकर यांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात दाखल अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आरोर्षीच्यावतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, त्यावर सोमवारी सुनावणी होत न्यायालयाने पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, मोबाईल जमा करणे आदी अटींसह ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला.












