मिरजोळे माजी सरपंच हल्ला प्रकरणी तब्बल ४० जणांवर गुन्हा दाखल… बघा नेमकं काय झालं

crime marhan

रत्नागिरी | प्रतिनिधी :
शहरानजीकच्या मिरजोळे जांभूळफाटा येथे बुधवार 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा.सुमारास वाढदिवसाचा बॅनर काढल्याच्या रागातून दोन गटात मारहाण झाली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरजोळे गावातील पाटीलवाडी येथील तरुणांनी मुख्य रस्त्यावर वाढदिवाचा बॅनर लावला होता.मंगळवारी सायंकाळी तो बॅनर माजी सरपंच संदीप नाचणक यांनी काढला.त्यावरुन या वादाला सुरुवात होउन चर्चेनंतर वाद मिटला होता.परंतू बुधवारी रात्री काही तरुणांनी संदीप नाचणकर यांना जाभूंळफाटा येथे बोलावले.संदीप नाचणकर भावासह तिथे गेले असता बॅनर काढण्याच्या रागातून त्यांच्यात पुन्हा वाद झाला.तेव्हाच पाटीलवाडीतून आलेल्या जमावापैकी एकाने संदीप नाचणकरच्या डोक्यात चॉपरने वार करत त्यांच्या भावालाही बेदम मारहाण केली. स्थानिकांनी दोघांनाही तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.
बुधवारी रात्री संदीप नाचणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रत्नदीप पाटील,अभि पाटील,वैभव पाटील,हर्षराज पाटील व इतर 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..तर याबाबत परस्पर विरोधी तक्रार देताना हर्षराज पाटीलने दिलेल्या तक्रारीनुसार,संदीप नाचणकर,योगेश भोसले,भाया कदम,नाना नाचणकर, प्रणय पावसकर इतर दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.