खेड येथे मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

खेड : तालुक्यातील खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी गावातील आंबवाडी स्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना 26 ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.

 

रविंद्र दाजी आंब्रे (वय 51, रा. कुडोशी आंबेवाडी) याने मोटार वेगाने चालवून त्या वेळी समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार संजोग दीपक शिंदे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

या अपघातप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक पांडुरंग गोरे यांनी दाखल केली असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.