मडूरा श्रीदेवी माऊली नवरात्रौत्सव समिती अध्यक्षपदी सिद्धेश परब

बांदा : प्रतिनिधी

मडूरा येथील श्रीदेवी माऊली नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी सिद्धेश ज्ञानेश परब तर उपाध्यक्षपदी संतोष विजय परम यांची बिनविरोध निवड झाली. समिती सचिव पदी संतोष जगन्नाथ परब यांची फेरनिवड करण्यात आली.

मडूरा येथील माऊली मंदिर सभागृहात माजी अध्यक्ष नकुल परब यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, फुगडी, दशावतारी नाटक, दांडिया स्पर्धा, लहान मुलांचे विविध स्पर्धात्मक खेळ आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

देवस्थान समिती आणि गावातील सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन नवरात्र उत्सव यशस्वीपणे पार पाडणार, असा विश्वास नूतन अध्यक्ष सिद्धेश परब यांनी व्यक्त केला.

संतोष विजय परब

संतोष जगन्नाथ परब