जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू
लांजा (प्रतिनिधी) सततच्या आजारपणाला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या ७१ वर्ष वृद्धाचे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. ही घटना दिनांक २२ ऑगस्ट रोजी घडली होती .या याबाबतची माहिती लांजा पोलिसांनी गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी पत्रकारांना दिली.
लांजा रोहिदास वाडी येथे राहणारे गुणाजी लक्ष्मण लांजेकर (वय ७१) यांनी दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजता आजाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध प्राशाण केले होते. हे बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना गुणाची लांजेकर प्रथम लांजा ग्रामीण रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते. या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी रात्री पावणे ९.३६ वाजता याबाबतची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलीस हे.काॅं. राजेंद्र कांबळे हे करत आहेत











