सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी घेतले आरवली येथे श्री देव वेतोबाचे दर्शन..

वेंगुर्ले : दाजी नाईक

जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी आरवली येथे सहकुटुंब श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थानच्या वतीने अध्यक्ष श्री. जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले.

या भेटी दरम्यान त्यांनी श्री. देव वेतोबा देवस्थानची महती आणि इतिहास जाणून घेतला तसेच श्री देव वेतोबाच्या दर्शनाने प्रसन्न झाल्याचे सांगितले. श्री देव वेतोबा देवस्थानला तीर्थक्षेत्र विकास योजनेत ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

श्री देव वेतोबा देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कामांची सविस्तर माहिती अध्यक्ष श्री. जयवंत राय यांनी त्यांना दिली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बासुर यांनी देवस्थान समितीच्या या सामाजिक कामांचे कौतुक केले व ‘ब’ वर्गातील उर्वरित कामांबद्दल सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी श्री देव वेतोबा देवस्थान समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी देवस्थान समितीचे सचिव श्री. आबा टाककर, डॉ. शैलेंद्र नाईक, मा.पोलीस पाटील श्री. मधुसूदन मेस्त्री, आरवली ग्रा.पं. ग्रामसेवक श्री. केतन जाधव, लिपिक श्री. बाबू रगजी, श्री. रमण शेल्टे आदी उपस्थित होते.