देवगडचे सुपुत्र श्रेयस शाहकर यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

देवगड : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, देवगड-सिंधुदुर्गचे श्रेयस शाहकर यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

या नव्या पदाधिकारी यादीत श्रेयस शाहकर यांचा समावेश असून, त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. देवगडच्या सुपुत्राला या पदावर संधी मिळाली असल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

देवगड-सिंधुदुर्गमधून थेट महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या पदावर निवड झाल्याने शाहकर यांच्या राजकीय संघटनात्मक कार्याला प्रदेशस्तरावर नवी जबाबदारी मिळाली आहे.