विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश..
म्हापण : प्रतिनिधी
उत्साही मित्रमंडळ, म्हापण यांच्या वतीने यंदाचा नवरात्रोत्सव २०२६ विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ११ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत म्हापण-पाट बाजारपेठ, पिंपळपार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा.दुर्गादेवीचे आगमन, पूजन, आरती व तिर्थप्रसाद, सायं ७.३० वा.ग्रामस्थांची भजने होणार असून, रात्री ९ वा.गावातील महिलांसाठी खेळ संगीत पैठणीचा कार्यक्रम, सोमवार १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३०वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग, मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा.खुल्या व ग्रामीण रेकॉर्ड डान्स स्पर्धा, खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक बक्षीस ४०००/रुपये, द्वितीय क्रमांक ३०००रुपये,, तृतीय क्रमांक२०००/ रूपये,व कायमस्वरूपी चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.तर ग्रामीण रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ३०००/रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांक२०००/ रुपये तसेच तृतीय क्रमांक१०००/रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.बुधवार १४ ऑक्टोंबर रोजी रात्री ९.३० वा. ‘चिमणी पाखरं टीम ‘कुडाळ आयोजित नृत्य रंग मंच२०२६ आकर्षक नृत्यांचा शो सादर होणार आहे.गुरुवार १५ ऑक्टोंबर रोजी रात्री ९.३० रोजी बाबा मेस्त्री ग्रुप नेरूर निर्मित कोकणचो शिमगो‘ सादर होणार आहे.शुक्रवार १६ ऑक्टोंबर रात्री ९.३० वा. ॲंकर डान्स अकॅडमी, सावंतवाडीचा ‘व्हरायटी शो’ सादर केला जाणार आहे.
शनिवारी १७ ऑक्टोंबर रोजी ९.३० वा. नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगाव-सावंतवाडी यांचा ‘साईबाबा’ हा ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. रविवारी १८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७.३० बुवा विनोद चव्हाण व बुवा संदिप लोके यांचा जंगी डबलबारीचा सामना रंगणार आहे.सोमवार १९ ऑक्टोंबर रोजी रात्री ९.३० वा.‘आई तुळजा भवानी कला, मुंबई निर्मित दोन अंकी मालवणी नाटक‘बायकोचो बैल’ हे मालवणी नाटक सादर केले जाणार आहे.मंगळवारी २० ऑक्टोंबर रोजी विजयादशमी दसरा सकाळी ११ वा.श्री.सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद,रात्रौ ९ वा. आकर्षक झंकार ऑर्केस्ट्रा, कोल्हापूर यांचा हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी २१ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वा.महाप्रसाद व सायंकाळी ५ वा.दुर्गा देवीची वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थ व रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्साही मित्रमंडळ, म्हापण यांच्या वतीने करण्यात आले आहे.












