विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, मंदिरात अभिषेक, सायकल स्पर्धा आणि अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन
शिरगाव (प्रतिनिधी) –महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव जिल्हा परिषद गटात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत साळशी येथील इनामदार श्री सिद्धेश्वर मंदिर तसेच कुवळे येथील श्री रामेश्वर मंदिरात तसेच शिरगाव येथे अभिषेक करण्यात आला.
भाजप युवा मोर्चा देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम यांच्या वतीने शिरगाव, साळशी, तोरसोळे, कुवळे, हडपिड, निम्मतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच शिरगाव येथे स्लो सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली.
कुवळे घाडीवाडी येथे डोंगरी विकास योजनेअंतर्गत १२ लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटनही या निमित्ताने पार पडले.
या सर्व उपक्रमांना भाजपा पदाधिकारी, त्या त्या गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण विकासाला चालना देत विकासाची नवी दिशा दाखवली आहे.













