श्री स्वयंमेश्र्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चा उपक्रम
वेंगुर्ले : प्रतिनिधी
श्री स्वयंमेश्र्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., मठ यांच्या वतीने महिला शेतकरी प्रमाणपत्र मोफत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील सुमारे १५० महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र आवश्यक असते. अनेक महिलांना या प्रमाणपत्राबाबत माहिती नसल्याने सोसायटीच्या माध्यमातून हे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर सोसायटीचे चेअरमन श्री. सुभाष चंद्रकांत बोवलेकर, संचालक मंडळ व सचिव उपस्थित होते. उपस्थित महिलांना प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामुळे मठ व परिसरातील शेकडो महिला शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, उपस्थित महिलांनी सोसायटीचे आभार मानले.













