अनुसूचित जातीतील कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्येने भाजपा पक्षांमध्ये सहभागी व्हावे

भाजपा अनुसूचित चे जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे यांचे आवाहन, अनुसूचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

लांजा (प्रतिनिधी) : अनुसूचित जातीतील कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्येने भाजपा पक्षामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अनुसूचित चे जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे यांनी लांजा येथे केले.
लांजा तालुका भारतीय जनता पार्टी दक्षिण व उत्तर मंडळाची बैठक अनुसूचित चे जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित व मंडळ अध्यक्ष विराज हरमले यांच्या अध्यक्षतेखाली लांजा रेस्ट हाऊस येथे आज पार पडली. या बैठकीमध्ये उत्तर मंडळ व दक्षिण मंडळाचे अनुसूचित चे मंडळ अध्यक्ष नेमणुका करण्यात आल्या. यामध्ये उत्तर मंडळ साठी प्रफुल्ल कांबळे यांची तर अनुसूचित दक्षिण मंडळ म्हणून शशिकांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अनुसूचित रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस पदी बबन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतची नियुक्तीपत्रे त्यांना देण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भाजपा पक्षाच्या माध्यमातून दलित समाजाला पुढे नेण्यासाठी, समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. काहीजण अफवा पसरवतात की भाजपा पक्ष चुकीचा आहे परंतु हे सर्व चुकीचे आहे. आज भाजपा पक्ष बेरोजगारांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची जबाबदारी घेऊन सर्वांना पुढे आणण्याचे काम त्या पक्षाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे अनुसूचित जातीतील ५९ या जाती आहेत या समाज बांधवांना, कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही अधिकाधिक संख्येने भाजपा पक्षामध्ये सहभागी व्हावे
याबरोबरच नव्याने नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, भाजपा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि त्यांना सन्मानाने वागणूक देणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटना तालुक्यात अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने कामाने लागा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय कुरूप , अनुसूचित जिल्हा उपाध्यक्ष अनिल कांबळे, उत्तर मंडल सरचिटणीस प्रथमेश बेंडल, संजय यादव, संजय आयरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अजय गुरव, प्रमोद कुरूप, इकबाल गिरकर, शेखर सावंत, रवींद्र राणे उपस्थित होते.