गौरव पोंक्षे माखजन:
प्रत्येकाने पुस्तक वाचनाकडे वळले पाहिजे,जर पुस्तकांशी नाते जडले तर प्रत्येकाची मराठी भाषा समृद्ध होईल असा विश्वास मराठी भाषेच्या अभ्यासक,गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.निधी पटवर्धन यांनी व्यक्त केले.
त्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे प्रत्येकाने मराठी भाषा समृद्ध कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक महादेव परब उपस्थित होते. व्यक्त केला.त्या पुढे म्हणाल्या की, विविध भागात मराठीत तिथल्या तिथल्या प्रांतानुसार बोली भाषेत बोललं जात.परंतु प्रत्येकाला प्रमाण मराठी भाषा आली पाहिजे असे नमूद केले.
अनेक विध दाखले देत डॉ.निधी पटवर्धन यांनी मूळात मराठी भाषा समृद्ध कशी आहे हे पटवून दिले.मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा शासनाने दिला आहे.पण या सोबतच प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगत भाषेवर प्रभुवत्व मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नमूद केले.
.विद्यार्थ्यांना हसत खेळत प्रश्न विचारात मराठी बाबत रुची निर्माण होईल असे मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी देखील प्रतिसाद दिला.यावेळी गट प्रमुख विठ्ठल भोईर,महादेव शिंदे,संतोष कुलकर्णी,प्रा संजय सूर्यवंशी,अभिजित सहस्त्रबुद्धे,विशाखा धावडे,रवींद्र पवार,हरिश्चंद्र पागडे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गौरव पोंक्षे याने केले.












