वेंगुर्ले पाटीलवाडा येथील वृद्धाची घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले शहरातील सातेरी मंदिरा च्या पाठीमागे पाटीलवाडा येथील एका वृद्धाने आपल्या घरातील हॉलमध्ये लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. न्हानू उर्फ बाबल बाबू परब वय ६५ वर्षे असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वेंगुर्ले पोलीस ठाण्यात प्रकाश शशिकांत देसाई यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, आपले सासरे न्हानू परब हे गेल्या पंधरा वर्षापासून मानसिक आजाराने आजारी होते. त्या अवस्थेत काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरात कोणीही नसताना घरातील हॉलमध्ये लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. आम्ही घरात आल्यानंतर ते मयत स्थितीत आढळून आले. त्यानुसार वेंगुर्ले पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो. हवालदार चव्हाण करीत आहेत.