गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी मंगेश रामदास कोंडविलकर यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.
जानवळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच निवडणूक पार पडली.यामध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी उपसरपंच पदासाठी मंगेश रामदास कोंडविलकर व प्रसन्न प्रकाश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मंगेश कोंडविलकर यांना ७ मते तर प्रसन्न प्रकाश पाटील यांना ३ मते प्राप्त झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी गोरक्ष सोनावणे यांनी मंगेश कोंडविलकर हे विजयी झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वैभवी विनोद जानवळकर, ग्रामपंचायत सदस्य मूबीन ठाकूर, अनिल कोलंबेकर, सेजल धामणस्कर, विजया शितप, अनिता जाधव, विभावरी लांजेकर उपस्थित होते.
उपसरपंच निवडणुकीमध्ये विजय झालेले मंगेश रामदास कोंडविलकर यांचे गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, कोतलुक ग्रामपंचायत उपसरपंच सचिन ओक, साईनाथ कळझुणकर, सचिन कोंडविलकर, प्रशांत शिरगावकर, संदीप कोंडविलकर, महेश जाधव, विनोद जानवळकर, तेजस कोंडविलकर, महेश तांबे यांनी व जानवळे गावातून अनेक नागरिकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












