बांद्यात सापळा रचून केली अटक
आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अखेर ताब्यात घेण्यात यश आले आहे बबन उर्फ भोंदू नागप्पा देसाई वय 37 (रा. दुर्गादेवी गल्ली, जोयडा, जिल्हा कारवार, कर्नाटक) यालाअटक करून कोर्टासमोर हजर केले असता एमसीआर कस्टडी देण्यात आली.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कातिवले करत आहेत.
आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/2024 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 324, 323, 504 आणि 506 अंतर्गत 14 मे 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याची नोंद जिल्ह्यातील पाहिजे आरोपींच्या अभिलेखावर करण्यात आली होती.
दोन वर्षांपासून बदलत होता वास्तव्य
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा त्याच्या मूळ पत्त्यासह संभाव्य ठिकाणी अनेकदा शोध घेतला. मात्र, आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध घेऊन त्याला अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय बातमीदारांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी पथकाने चार ऑक्टोबर रोजी कर्नाटक येथे रवाना झाले तेथे आरोपीचा शोध घेत असताना तो सतत आपले वास्तव्य बदलत असल्याचे समोर आले त्यामुळे त्याच्या हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आला दरम्यान आरोपी 6 ऑक्टोबर रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी बांद्याला येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने आरोपीला बांदा परिसरातून ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर करावाई साठी आचरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक दहीकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस उप निरीक्षक सुधीर सावंत पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसूजा तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष जमादार आदींच्या पथकाने संशयितास ताब्यात घेण्यात यशस्वी झाले.













