गुहागर प्रतिनिधी:
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणारे श्री.देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर चे शिक्षक श्री.मधुकर आनंदी-शंकर गंगावणे यांना रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्कार 2026देवून गौरविण्यात आले.
श्री.गंगावणे 1994पासून गणित विषयाचे शिष्यवृत्ती परीक्षेचे शाळेच्या कामकाजा व्यतिरिक्त मार्गदर्शन करतात त्यांचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
आपल्या शाळेव्यतिरिक्त वेळेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना नीट आणि जेईई परिक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन आणि प्रवेश पध्दती तसेच आवश्यक असलेले सरकारी दाखले यांची माहीती विनामूल्य देवून त्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
त्यांच्या ह्या कार्याची महासंघाने दखल घेत मा.प्राचार्य श्री.प्रशांत गणेश कुलकर्णी (पुणे)यांचे हस्ते शाल,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.













