दोन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आश्वासन
रत्नागिरी : नविन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून अनेक कारणांकरीता तलाठी दाखल्याची व अहवालाची विद्यार्थ्यांना व पालकांना आवश्यकता असताना रत्नागिरी शहरातील तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे.याबाबत जो पर्यंत नविन नियुक्त्या होत नाहीत,तो पर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी एका निवेदना द्वारे रत्नागिरी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शाहा, उपाध्यक्ष रफीक मुल्लाजी, तालुकाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग शाहरुख वागले, जिल्हा सचिव आतिफ साखरकर व सुहैल भाटकर यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली.जिल्हाधिकार्यांनी कॉंग्रेस च्या पदाधिकार्यांना दोन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे.
नविन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना अनेक कारणांकरीता दाखले व अहवालांची आवश्यकता असते.अश्यावेळी रत्नागिरी शहरातील तिन्ही तलाठ्यांच्या बदल्या झाल्यामुळे तिन्ही पदे रिक्त झाली आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना तासन तास कार्यालयाबाहेर उभे रहावे लागत आहे.नागरिकांची कामे रखडली असून जनतेची गैरसोय होत आहे.याबाबत आज जिल्हाधिकार्यांना कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन व शहराध्यक्ष रमेश शाहा यांनी यासंदर्भात निवेदन दिले.त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी दोन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे










