खेड येथे विकसित भारत संकल्प सभा

मंडणगड प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभा’ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता खेड येथील गणेश मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास श्री. प्रमोदजी जठार, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, विविध मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठांचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ९ वाजता वेळेत गणेश मंगल कार्यालय, खेड येथे उपस्थित राहावे, असेही कळविण्यात आले आहे.