डीबीजेत विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची सभा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची सभा प्राचार्य डॉ. माधव बापट व उपप्राचार्या सौ. स्नेहल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या समन्वयक प्रा. सौ मृण्मयी सोहोनी यांनी प्रास्ताविकात वर्षभर विद्यार्थी मंडळाने करावयाच्या कामाचा आढावा घेतला. विद्यार्थी प्रतिनिधींना वर्षाच्या सुरुवातीला त्यांची कार्य व उद्दिष्टे समजावून देण्यात आली. त्याचप्रमाणे वर्षभर कॉलेजमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
त्यावेळी प्राचार्य व उपप्राचार्या यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विशेषतः स्नेहसंमेलनाच्या व वर्षभर चालणाऱ्या इतर उपक्रमांवेळी वर्ग प्रतिनिधी व स्वयंसेवक यांच्या भूमिके विषयी चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी वर्षभर वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याविषयी सुद्धा सूचना देण्यात आल्या नंतर सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांचे वर्ग प्रतिनिधी म्हणून नेमणूकपत्र प्राचार्यांच्या हस्ते देण्यात‌ आले. यावेळी सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रा. अनंत ढेरे, प्रा. स्वरदा कुलकर्णी, प्रा. तृप्ती यादव, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. परेश कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.