आचरा-अर्जुन बापर्डेकर
आचरा बागेश्री वहाळ येथे ग्रामपंचायत आचरा मार्फत वनराई बंधारे बांधण्यात आला. याचा शुभारंभ जि. प. सदस्य सौ वर्षा सांबारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पालक मित्र जिल्हा नियोजन अधिकारी बुधावले , आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातविले यांनी सदर स्थळी भेट दिली.या श्रमदान कार्यक्रमात आचरा सरपंच . जेरोन फर्नांडिस, मालवण खरेदीविक्री संघाचे चेअरमन राजन गावकय,उपसरपंच . संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, चंद्रकांत कदम, ग्रामपंचायत अधिकारी पदमाकर कासले, कृषी सहाय्यक राधाकृष्ण धाकोरै तसेच पोलीस पाटील, सर्व आरोग्य सेवक आरोग्य- सेविका, अंगणवाडी सेविका-मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्स्थ बचत गट महिला, व ग्रामस्थ उपस्थित होते













