शिवगंध प्रतिष्ठान, लांजा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचा संयुक्त उपक्रम
संतोष कोत्रे
लांजा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साटवली गढीच्या ठिकाणी
शिवगंध प्रतिष्ठान लांजा आणि श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याने या गढीने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले तालुक्यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे.लांजा तालुक्यातील ऎतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या गढिचे संवर्धन व्हावे व वर्तमान पिढीला तालुक्याचा समृद्ध वारसा ज्ञात व्हावा या दृष्टिने,शिवगंध प्रतिष्ठान, लांजा आणि श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक
यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. राहुल मराठे यांनी स्वतः उपस्थित राहून मोलाचे सहकार्य आणि श्रमदान केले. तसेच यासाठी येथील ॲड. ओमकार गांगण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
शिवगंध प्रतिष्ठान, लांजा तर्फे आयोजित ‘शिवकालीन साटवली गढी स्वच्छता मोहीम’ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पडली. या स्वच्छता मोहिमेमुळे साठवली गढीने मोकळा श्वास घेतला आहे.













