चिपळूण (प्रतिनिधी) : ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई या संस्थेतर्फे ब्राह्मण समाजातील सर्व शाखांमधील १२ वी पासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारे विनंती अर्ज चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघात सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत उपलब्ध असतील.
ज्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना ही शिष्यवृत्ती घ्यायची असेल त्यांनी २५ ऑगस्टपर्यंत संपर्क करावा. अर्जाची फी १० रुपये आहे. पूर्णपणे भरलेले अर्जच स्वीकारले जातील. विद्यार्थ्याच्या नावाचे खाते बँकेत असावे लागेल. तरी गरजूंनी वेळेवर याचा लाभ घ्यावा. शिकणारा विद्यार्थी कोणत्या तरी शिक्षण संस्थेत नियमित शिक्षण घेत असावा











