मालवण | प्रतिनिधी : वेंगुर्ला येथून निघालेली व मालवणला येत असलेली एसटी बस गुरुवारी सायंकाळी मालवण कुपेरी घाटी येथे आली. यावेळी अचानक एसटी बस मधून धुराचे लोट आले. चालकाने एसटी बस थांबवली. याचं दरम्यान प्रवाशांनी दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना मोठा गोंधळ उडाला. एसटीत मागे असलेली एक महिला प्रवासी हिने घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारली. घाबरून अन्य काही प्रवासीही खिडकीतून उड्या मारून बाहेर आले. असे बोलले जात होते.
काळोख व झाडीझुडपे असल्याने कोणाला काही समजत नव्हते. याच दरम्यान ओरोस येथून मिटिंग आटोपून कुंभारमाठ येथे घरी येत असणाऱ्या आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड यांनी आपली फोर व्हीलर थांबवून काय झाले याची माहिती घेतली. त्यावेळी गाडीतून उडी मारलेली महिला दुखापतग्रस्त झालेली पाहून त्यांनी तातडीने त्यांना आपल्या गाडीतून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केले. जमिनीवर आपटल्यामुळे हाताला व पाठीला मार लागला असल्याने वेदना होत होत्या. यावेळी मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, मोहन वराडकर, निकीत वराडकर त्याठिकाणी दाखल झाले. जखमी महिलेची विचारपूस करण्यात आली. तसेच अपघात ठिकाणची माहिती घेतली. नातेवाईकही दाखल झाले.
जखमी युवती मालवण येथील असून कुडाळ येथे कामाला जाते. सायंकाळी कुडाळ बसने मालवणाला येत असताना काळसे होबळीचा माळ येथे सीएनजी बस बंद पडली. त्यावेळी मागून येणाऱ्या वेंगुर्ला मालवण बस मध्ये त्या कुडाळ बस मधील प्रवसी बसले. ही बस पण सीएनजी होती. बस खचखच भरली. पेंडूर मार्गे येत असताना कुपेरी घाटी येथे 7:30 वाजण्याच्या सुमारास चढावावर गाडीतून मोठा आवाज आला व धुर लोट पसरले. गाडी पिकअप घेणे पण बंद केले. गाडी सीएनजी असल्याने चालकाने खबरदारी म्हणून गाडी बंद करून स्विच बंद केला. धूर येतच होता. गाडीला आग लागली यां भीतीने प्रवासी घाबरले. पुर्ण भरलेल्या गाडीतील सर्व प्रवासी बाहेर येण्यासाठी दरवाजात एकवटले. याचवेळी गाडीतील त्या युवतीने खिडकीतून उडी मारली. अशी माहिती समोर आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादा नाईक यांना माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत मदतकार्य केले. गाडीतील अन्य कोणत्या प्रवश्याना दुखापत झाली का? याबाबत चालक वाहत विचारणा करत मदतकार्य करत होते. याचवेळी त्या मार्गांवरून जाणाऱ्या अन्य गाडीतुन बहुतांश प्रवासी निघाले. काही जणांचे नातेवाईकही आले.
मात्र गाडीतून धुर कसा आला? नेमके काय घडले? हे समजू शकले नाही. गाडी सीएनजी असल्याने तात्काळ बंद केली असे चालक यांनी सांगितले. दरम्यान मालवण डेपोचे अधिकारी कर्मचारी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले होते. तसेच बंद पडलेल्या गाडीला मालवण डेपो मध्ये आणण्याची व्यवस्था केली जात होती.













