सेवा संकल्प अभियान अंतर्गत चिपळूण भाजपाच्यावतीने उक्ताड अंगणवाडीत खेळणी भेट

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर संपूर्ण एक महिना सेवा संकल्प अभियान हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रम समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात येतात. तसेच चिपळूण शहरातील विविध अंगणवाडीना भेट देऊन तेथील मुलांना भेटवस्तू तसेच अंगणवाडी संदर्भातल्या काही अडचणी असतील त्या समजून घेणे, अंगणवाडी सेविकांचा सन्मान करणे उपक्रम संपूर्ण शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात आला. यापैकीच उक्ताड येथील सार्वजनिक गणेश मंडळ अंतर्गत असलेली अंगणवाडीला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष व माजी नगरसेवक आशिष खातू यांच्यावतीने मुलांना लागणाऱ्या लहान सायकल, गाड्या तसेच विविध खेळी भेट देण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनिस यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर मंडल अध्यक्ष व नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा अध्यक्षा व नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका शितल रानडे सार्वजनिक गणेश मंडळाचे बाळशेठ वेस्वीकर, विलास बांद्रे, प्रभंजन पिंपूटकर उकताड गावचे गावकर श्री अनंतबुवा किंजळकर अगंणंवाडी सेविका कपडेकर मॅडम,गोवळकर आजी तसेच स्थानिक रहिवासी विलास कांबळी, रुपेश दिवाळे, राकेश दिवाळे, गणेश भुवड, वैभव निर्मळ, अभिषेक बुरटे विकास बुरटे, संजय (अण्णा) जोगले, मंगेश वेस्वीकर, संतोष कुळे, मन्नाभाई भोसले, रमेश भोसले, वैभव निर्मळ, सौ सायली कदम, सौ. बुरटे व इतर महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बूथ प्रमुख उल्हास भोसले, स्वाती देवळेकर, सुनील खरात, निनाद आवटे, महेश कांबळी, रोहन जडे, मधुकर निमकर, अभिषेक जागुष्टे, दिनेश लटके, विलास चव्हाण, नरेंद्र बेलवळकर, विनायक भैरवकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.