चिपळूणात जागतिक हृदय दिनानिमित रॅली काढून जनजागृती

चिपळूण (प्रतिनिधी) : लाईफ केअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफकेअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लेन्मार्क फार्माक्युटिकल लि. यांच्या सह्कार्यने एम.ई.एस कॉलेज यांच्या मार्फत जागतिक हृदयदिनानिमित चिपळूण येथे रॅली काढून हृदयाच्या आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली.
ही रॅली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरु झाली त्यानंतर ही रॅली नगरपालिका व तेथून मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाच्या प्रांगणामध्ये आली. तेथे पथनाट्य व आरोग्य विषयक घोषणा देऊन चिपळूण करांना आरोग्य उत्तम ठेवण्याचा संदेश लाईफकेअर हॉस्पिटलच्या मार्फत देण्यात आला. त्यावेळी ग्लेन्मार्क फार्माक्युटिकल लिमिटेड कंपनीचे वैदयकीय प्रतिनिधी विनायक भोकरे व अमोल शिर्के तसेच डॉ. ज्योती यादव तालुका हेल्थ आरोग्य अधिकारी. डॉ. गरुड वैदयकीय अधिकारी, शैनाज सावंत PHM. एम.ई.एस. कॉलेजच्या शिक्षिका सौ. सुप्रिया माळी, विशाल चोपडे, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिक्षिका रुचीता भालेकर, सानिका ठसाळे, लाईफकेअर हॉस्पिटलचे मार्केटिंग इन्चार्ज सुशांत सालीम, हर्षद पाटील, संकेत मालवणकर, सिकंदर कडवेकर, मृदुल तेली, ओंकार फुटाणे, प्रदीप पवार, मिना मोहिते. रुग्णवाहिकेसह राहुल निगडे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रमाणे लाइफकेअर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत सुर्वे यांनी नगरपालिका, एस.टी व्यवस्थापक, चिपळूण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे आभार मानले.