फोंडाघाट येथे महिला शेतकरी प्रमाणपत्र मेळावा उत्साहात संपन्न !

जि. प. सदस्य राजन चिके यांच्या स्तुत्य उपक्रमाचे महिला भगिनींकडून कौतुक !

तालुका कृषी विभाग आणि उमेद चा सहभाग !

फोंडाघाट : कुमार नाडकर्णी —
येथील पूर्णानंद हॉलमध्ये, शासनाने आवश्यक केलेल्या,महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळावा जि. प. सदस्य राजन चिके यांनी नुकताच आयोजित केला. या मेळाव्यामध्ये सुमारे ४७८ महिलांनी शेतकरी प्रमाणपत्र साठी नोंदणी करून, राजन चिके यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले…

कार्यक्रमाचा छोटेखानी शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी व्यासपीठावर जि.प. सदस्य राजन चिके, अध्यक्षस्थानी सुरेश सामंत, मंडळ कृषी अधिकारी दुर्वा झुलपे, उप कृषी अधिकारी मानसी वेर्लेकर,सहा. कृषी अधिकारी अक्षया परब, तालुका व्यवस्थापक उमेद च्या दक्षता पांजरी, ताम्हणकर, प्रभाग समन्वयक विठ्ठल परब, उपसरपंच तनवी मोदी, सायली तेली,मिलिंद लाड, अमित चव्हाण, अरुण सामंत इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते ….

कृषी विभागातर्फे अधिकारी दूर्वा झुलपे, मानसी वेर्लेकर, उमेद च्या दक्षता पांजरी, यांनी या प्रमाणपत्राचे महिलांच्या जीवनातील महत्त्व,त्याचे फायदे आणि शेतकरी म्हणून महिलांना अधिकृत ओळख मिळणार असल्याचे सांगितले. महिलांना शेती, फळबागा, फुलशेती, शेती पूरक व्यवसाय, प्रशिक्षण आर्थिक भांडवल यामधून महिलांना स्वावलंबी बनणे सुखकर होणार आहे. याची जागृती होऊन,प्रत्येक महिला बचत गटाशी जोडली जाऊ,प्रमाणपत्रधारक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही महिला शेती प्रमाणपत्र पासून वंचित राहता नये.त्यांना या प्रमाणपत्राचे लाभ मिळवून देण्यास शासनातर्फे उमेद व कृषी विभाग सदैव सहकार्य करेल….

उपसरपंच तनवी मोदी यांनी जि.प सदस्य चिके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून, या ग्रामीण भागातील महिलांसाठी हा मेळावा आवश्यक असून, त्याबद्दल कौतुक केले. राजन चिके यांनी आपल्या भागातील महिलांना या प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्रास पडत होता. केवळ सर्वांना एकाच ठिकाणी हे प्रमाणपत्र उपलब्ध होईल, या उद्देशाने हा मेळावा घेतला आणि त्याला प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांनी महिलांचे आभार मानले .अध्यक्ष सुरेश सामंत यांनी या प्रमाणपत्रामुळे महिला शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदानांतर्गत अपघाती निधन झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळणार असून, महिलांसाठी सुरक्षा कवचासह लाभ देणारी ओळख ठरणार आहे. असे सांगितले या मेळाव्यास दर्शना पेडणेकर, भरत मोरे, सीआरपी, तसेच आनंद चिके, आत्माराम नांचे, नंदन कदम, भाई तेली आशा सेविका आरोग्यसेविका आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता….