जलसंधारणासाठी मठखुर्द ग्रामस्थ सरसावले

मठखुर्द येथे श्रमदानातून बांधला बंधारा

कणकवली;
पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यासह आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनसंधारणाची कामे करणे ही काळाची गरज बनली आहे. यात सामाजिक बांधिलकीतून मठखुर्द ग्रामस्थांनी एकत्र येत मठखुर्द येथे बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविला.

गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतल्याने या उपक्रमातून पाणी बचतीचा आणि लोकसहभागाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीतून

बदलत्या हवामानामूळे पावसाचे अनियमित स्वरूप, वाढते पाणी टंचाई आणि शेती समोरील आव्हाने लक्षात घेता गावोगावी जलसंधारणाची कामे होणे आवश्यक आहे. बंधारे बांधणे, पावसाचे पाणी अडविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यामुळे स्थानिक पातळीवर जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यास मदत होऊ शकते. मठखुर्द येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले.

मठखुर्द गावातील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जलसंधारण हे केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक गावाची आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे हा संदेश मठखुर्द येथील बंधारा बांधण्याच्या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी गावच्या सरपंच सौ. अनूजा रावराणे उपसरपंच स्नेहल नेवगे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सावंत ग्रामपंचायत माजी सदस्य महेश राणे, मंगेश नेवगे पोलीस पाटील विजय सावंत, अनंत राणे , प्रदीप घावरे, राजेश राणे, संतोष लाड, रामचंद्र सावंत, दिपक सावंत, उदय राणे, सुर्यकांत सावंत, गणेश कदम, योगेश तावडे, ओमकार सावंत, शुभम कदम, मयुरेश सावंत , सुशांत सावंत तसेच गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते