करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने सह्याद्री जीव रक्षक टीमचा सत्कार

शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, बचत गट संघाचे अध्यक्ष, सीआरपी यांचाही सन्मान

वैभववाडी | प्रतिनिधी : करुळ येथील ग्रामसभेत सामाजिक बांधिलकी जोपासत कार्यरत असणाऱ्या सह्याद्री जीव रक्षक टीमचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी यांचाही सत्कार करण्यात आला. करुळ ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच नरेंद्र कोलते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला 115 ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपसरपंच सचिन कोलते, बाळा कदम, नुतन तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास सावंत, विलास गुरव, जितेंद्र पवार, रेखा सरफरे, संध्या शिवगण, रोहिणी लाड, माधवी राऊत, दिपाली जामदार, रमेश पांचाळ, रमेश कोलते, पो.पा. प्रताप पाटील, रवींद्र पवार, कृषी विस्तार अधिकारी श्री. जाधव, रोजगार हमी प्रतिनिधी अमित चव्हाण, ग्रामसेवक शशिकांत गुरव व अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती तसेच अपघातस्थळी पोलीस प्रशासन व आपत्ती प्रशासनाला सहकार्य करणा-या करुळ सह्याद्री जीव रक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साची कोलते, राजेंद्र गुरव, विजय पाटील, रिया सावंत, अनामिका कदम, शरयू जामदार या सहा पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सखी महिला बचत गट संघाच्या अध्यक्ष रेखा सरफरे, सचिव रेश्मा कोलते, सीआरपी दिपाली जामदार, रोहिणी लाड यांचा सन्मान करण्यात आला.
या सभेत रोजगार हमी योजना विभागाचे अमित चव्हाण यांनी रोजगार हमी विषयक विविध योजनांची माहिती दिली. कृषी विस्तार अधिकारी जाधव यांनीही मार्गदर्शन केले. सामुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती चोचे यांनी क्षयरोग बाबत माहिती दिली. सभेत तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी विश्वास उर्फ बबन सावंत यांची निवड करण्यात आली. नुतन अध्यक्ष सावंत यांचे अभिनंदन करण्यात आले.