पेढे येथून तरूण बेपत्ता

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पेढे येथून रेंटा हांसदा (३६, रा. फतेपुर कालीतला, थाना होईंगाथा, जिल्हा नोदिया, कलकत्ता (पश्चिम बंगाल) हा इसम गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता आहे. याबाबतची तक्रार शंकर शांती सरकार रा. सरकार गौरव नगर, गोंदिया, जिल्हा गोंदिया सध्या राहणार खेरशेत ता.चिपळूण जि. रत्नागिरी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे.
ही व्यक्ती अद्याप पर्यंत मिळून आलेली नाही. सदर व्यक्ती ५ फूट ६ इंच उंच, रंग सावळा, अंगाने-सडपातळ, केस काळे कुरळे, उजव्या हाताची करंगळीच्या बाजूचे बोटाला ऑपरेशनची खुण असून सदरचे बोट थोडे वाकडे आहे, पायात स्लीपर आहे. सदर इसम कोणाला आढळून आल्यास किंवा त्याचेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाल्यास चिपळूण पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याबाबत चिपळूण पोलिसांनी आवाहन केले आहे