मसुरे | झुंजार पेडणेकर : भारताचे माजी राष्ट्रपती तथा शास्त्रज्ञ/वैज्ञानिक दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील व त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला गावातील वाचक ग्रामस्थ व मुलांचा प्रतिसाद लाभला.
ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. उदय प्रभाकर परब, उपाध्यक्ष श्री. मधुसुदन दत्तात्रय परुळेकर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला कार्यकारिणीतील अध्यक्ष श्री. उदय प्रभाकर परब, उपाध्यक्ष श्री. मधुसुदन परुळेकर, गजानन सुर्वे, ग्रामपंचायत कर्मचारी आशिष आचरेकर, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव, जि. प. कांदळगाव नंबर १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मेथर, उपशिक्षिका सौ. ज्योती कर्णे, ग्रंथपाल सौ. साक्षी मेस्त्री, कर्मचारी सौ. आर्वी मेस्त्री, अंगणवाडीच्या शिक्षिका सौ. अक्षता आचरेकर व अर्पणा पाटकर, शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













